मन म्हणजे तुम्ही आणि मन प्रसन्न नाही तर आपण कसे प्रसन्न राहणार ?
ज्याला प्रसन्नतेने जगता आल तो जिंकला . आजूबाजूला सगळं आहे .पैसा , बंगला ,गाड्या अगदी सगळं .
पण तरीही मन प्रसन्न नसेल तर मग आपल्यात काहीतरी गडबड आहे हे नक्की . सगळं असून सुद्धा हि बैचेनी का ? स्वतःला विचारून बघा बर. आपण आनंदी जगण्याची , समाधानी राहण्याची कला विसरत चाललोय का ? शिक्षण संपलं , नोकरी मिळाली , धंदा सुरु केला , लग्न झाल , मुलंबाळं झाली . पण तरीही मनाला काही शांतता नाही . काय अर्थ आहे अश्या जगण्याला ? सगळं असून सुद्धा नेहमीच रडायचं .आपण सर्व कधी शिकणार हसायला , आनंदी राहायला , प्रसन्न राहायला . आत्ता नाही शिकलो तर मग कधी शिकणार ? आणि मग आपण आपल्या पुढच्या पिढीला काय शिकवणार ? त्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा ?.
अर्थात सगळे तसे नाहीत पण एकंदर संख्या बघता खूप मोठ्या प्रमाणात असमाधानी लोकांची संख्या आहे अस दिसून येत . हे बघा आयुष्यात आपल्याला काही सगळं मिळणार नाही .काही ना काहीतरी सुटणारच . कदाचित मनाप्रमाणे काहीच मिळणार नाही . किंवा सगळं मनासारख सुद्धा होईल . पण , तरीही आपल्याला शिकायचंय जगायला . समाधानी आयुष्य जगायला . विचार करा , आपला चेहरा बघून इतरांना सुद्धा प्रसन्न वाटलं पाहिजे . रडका चेहरा बघायला कोणाला आवडत नाही बरका . लोक पळून जातील नाहीतर आपल्याला बघून . मग आपणच म्हणतो सगळे लांब पळतात माझ्यापासून .आपण जर हसरे , आनंदी , समाधानी राहिलो तर आपल्या आजूबाजूचं वातावरण पण आनंदी राहत . एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आजूबाजूला . आणि मग आपल्याला सुद्धा रोजच्या जीवनात कठीण प्रसंगांना शांतपणे सामोर जात येत .
समोरच्या व्यक्तीचा चेहरा पाहिल्यावर आपल्याला कळत कि ह्या व्यक्तीची मानसिकता काय आहे ? त्याचप्रमाणे इतरांना सुद्धा आपल्याकडे बघून समजत बरका . आयुष्याच्या अनेक वळणावर जो स्वतःला सावरून घेतो तो सहज वाटचाल करतो . ज्याला रडायची सवयच आहे ना तो रडत बसतो .काय झाल एक स्वप्न पूर्ण नाही झाल तर ? एक जॉब नाही मिळाला मग दुसरा शोधू . नवनवीन मार्ग शोधू . काही नाती नाही टिकणार शेवटपर्यंत हे सत्य सुद्धा जाणून घेऊ . आजूबाजूचे अपमान करणार , वेळप्रसंगी मदतीला कोणी नसणार , जवळच्या व्यक्तींकडून सुद्धा काहीतरी नको असलेली वागणूक मिळणार . हे सगळं होणारच कि आयुष्य म्हंटल कि . मग आपण किती वेळा रडणार , किती वेळा सगळ्याला दोष देत बसणार ?
![You are currently viewing प्रसन्न मन , प्रसन्न तुम्ही](https://connectmarathi.hanscreation.in/wp-content/uploads/2022/11/girl-g61fffdc03_1920.jpg)